खेळाडूंनी शांततापुर्ण व आनंदायी वातावरणात खेळ खेळावे…..खासदार अशोक नेते
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते.यांच्या शुभहस्ते संपन्न…
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
नववर्ष आगमनाने व सलग तीन वर्षाची परंपरा कायम ठेवीत मोठया आनंदाने उत्साहाने युवा वर्ग मैदानी कबड्डी खेळ स्पर्धा जय वाल्मीकी बहुउद्देशीय ढिवर समाज मंडळ,व वीर शिवाजी कबड्डी क्लब तळोधी (मो.)ता.चामोर्शी जि.गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य डे नाईट (वजन) कबड्डी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम मोठ्या संख्येनी युवा वर्ग, व गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात खासदार अशोक नेते यांचे आनंदाने गावात फेरी काढून स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना कबड्डी हा सांघिक खेळ असुन भावनेला प्रोत्साहन देणारा हा खेळ आहे. हा खेळ आठ दहा दिवस चालतो.या कबड्डी स्पर्धेत परिसरातून एकुण बाविस टीम च्या चमूंनी सहभाग दर्शविला असून पंचाचा निर्णय योग्य रीतीने मानूनच खेळ खेळतांना युवक खेळाडूंनी शांततापुर्ण व आनंदायी वातावरणात खेळ खेळावे.कबड्डी या खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिक दुष्टया चांगले राहण्यासाठी खेळ खेळावे.असे प्रतिपादन या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
पुढे बोलतांना खासदार अशोक नेते यांनी म्हटले या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक गावा संबंधित समस्या, व काहि अडीअडचणी, सांगीतल्या यावर विचार विनिमयाचे निराकरण नक्की होईल असा विश्वास देतोय.या खेळाच्या निमित्ताने बरेच दिवसापासून आपल्या गावातील लोकांशी भेट झाली.यात मला सुद्धा आनंद झाला. असे यावेळी खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केले.
यावेळी स्पंदन फाउंडेशनचे डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, प्रणय खुणे,यांनी सुद्धा चांगले युवकांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रामुख्याने उद्घाटक खासदार अशोक नेते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,स्पंदन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. मिलिंद नरोटे सर,प्र.सरपंच मनोहर बोदलकर,अतुल सुरजागडे, से.नि.उपनिरीक्षक कान्होजी लोहबंरे, प्रमोद आसुटकर, ग्रा.प.सदस्या तृप्ती चिळांगे, ज्योती बारसागडे,लता वासेकर,प्रतिक चिचघरे,गुरू गेडाम, किशोर गटकोजवार, मांदाळे जी,अनिल कोठारे,सुभाष वासेकर,किशोर कुनघाडकर, विनोद सातपुते, अमित शेरकी, गोलु भोयर,सूरज भोयर,प्रविण मेश्राम,काशिनाथ ठाकुर, तसेच गावातील नागरिक बंधू भगिनीं व युवा वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.