परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर येथे श्रीराम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस

पाथरी येथील परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बुधवार दिनांक 29 मार्च 2023 ते शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 या काळात श्रीरामनवमी उत्सव साजरा होत असून आज या मोहोत्सवाचा मुख्य आहे. त्यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत श्री ह भ प सर्वेश महाराज शुक्ला यांचे राम जन्म विशेष कीर्तन होणार असून सर्व भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व राम जन्म मोहत्सवाचा लाभ घ्यावा असे श्रीसाई स्मारक समितीच्या वतीने विश्वस्त मा. श्री.संजयजी भुसारी यांनी आवाहन केले.
चैत्र शुद्ध नवमी श्रीप्रभूरामचंद्राचा जन्मदिवस म्हणून देशभरात साजरा केला जात असून, परमपूज्य श्री साईबाबांच्या हयातीत शिर्डी येथे साईबाबा “श्रीरामनवमी” हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असत, तीच परंपरा साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्री साई स्मारक समिती, पाथरीने मंदिर स्थापनेपासून मागील 23 वर्षापासून जोपासली आहे. यावर्षीही श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.
तसेच आज मुख्य दिवशी पहाटे 5:30 वाजता साईबाबांचे कुलदैवत पंचबावडी हनुमान मंदिर येथे विश्वस्त श्री संजयजी भुसारी यांचे शुभ हस्ते अभिषेकाने आजचा मुख्य दिवशीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे 5:45 वाजता श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती झाल्यानंतर श्रींच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली, सकाळी नऊ वाजता धूनी पूजा संपन्न झाली, अॅड.श्री. अतुलराव चौधरी यांनी देणगी दिलेल्या गव्हाच्या पोत्याचे द्वारकामाई येथे त्यांचे शुभ हस्ते पूजन त्यांचे शुभहस्ते झाले, नंतर श्री सूर्यभानजी सांगडे मुख्य प्रवर्तक संस्थापक सदस्य तथा कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे वतीने अॅड.श्री. अतुलराव चौधरी सचिव तथा कार्यकारी विश्वस्त यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारण्यात आले, मध्यान्ह आरती नंतर महाप्रसाद होईल आणि सायंकाळी 4:30 वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. आणि सांगता दिवशी शुक्रवार दि. 31 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री ह भ प सर्वेश महाराज शुक्ला हिंगोलीकर, यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. अशी समितीचे विश्वस्त श्री संजयजी भुसारी यांनी दिली.