जय लहरी जय मानव विद्यालयाच्या समीक्षा चन्ने, श्रीया राणे यांनी निबंधस्पर्धेत मारली बाजी
मुख्य संपादकःकु. समिधा भैसारे
राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत जय लहरी जय मानव विद्यालयातील समीक्षा चन्ने आणि श्रीया राणे या विद्यार्थीनींनी गट एकमध्ये द्वितीय क्रमांक व प्रोत्साहनपर क्रमांक पटकावला.स्पर्धेत पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक भक्तदास जिवतोडे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला.प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे,दयाराम जांभुळे, कुशाब रोकडे,रमेश दांडेकर,भास्कर बावणकर,सुमय्या उपस्थित होते.मुख्याध्यापक भक्तदास जिवतोडे, सुरेश डांगे, रावन शेरकुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक तथा रोख रक्कम प्रदान करण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.शाळेला श्यामची आई पुस्तक भेट देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कुशाब रोकडे यांनी केले.प्रास्ताविक रमेश दांडेकर यांनी केले.आभारप्रदर्शन भास्कर बावणकर यांनी केले.