गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित आव्हान-२०२३ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराला खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने आयोजित सुमानंद सभागृह आरमोरी रोड, गडचिरोली येथे आव्हान -२०२३ चे थाटात शुभारंभ …महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य तथा कुलपती मा.श्री. रमेशजी बैस यांनी ऑनलाईन उपस्थित राहुन उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन मान्यवरांना व विद्यापिठाचे विद्यार्थी, विद्यार्थिंनींना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना या महाभयंकर विषाणू मुळे देश पुर्ण पणे हादरुन गेला होता.अशा ही आपती व्यवस्थापन परिस्थितीत देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये मोठे योगदान व यश प्राप्त करून त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.गोंडवाना विद्यापिठाने अतिशय चांगला उपक्रम व कार्यक्रम आयोजित केला. त्यांच मी अभिनंदन व कौतुक करतो.अशा आपती व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थी व विद्यार्थ्यांना णआवड,रुची निर्माण करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.प्रशांत बोकारे,प्र कुलगुरु डाॅ.श्रीराम कावळे,पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण,
डाॅ.श्याम खंडारे, तसेच पदाधिकारी, व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.