ग्राम पंचायत भवन लोकार्पण सोहळा संपन्न
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथे जनसुविधा निधी व म.ग्रा.रो.ह.यो सण २०२१-२०२२ या निधि अंतर्गत ग्राम पंचायत भवनाचे बांधकाम करण्यात व ते काम पूर्ण झाले असून आज दि.१३.३.२०२२ ला ग्राम पंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या वेळी,पंचायत समिती सभापती प्रफुलभाऊ खापर्डे,जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरसकोल्हे,जिल्हा परिषद सदस्या नैनाताई गेडाम, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सरपंच उश्राळमेंढा हेमंत लांजेवार,अध्यक्ष नागभीड तालुका सरपंच संघटना कमलाकरजी ठोंबरे,येणोली ग्राम पंचायतचे सरपंच अमोल बावनकर,ग्राम पंचायत सरपंच गंगासागर हेटी दिलीपजी गायकवाड,ग्राम पंचायत उपसरपंच उश्राळमेंढा जयेशजी लोंढे,ग्राम पंचायत सदस्य प्रकाशजी शेंद्रे, ग्राम पंचायत सदस्य पौर्णिमाताई बोरकर,अध्यक्ष तं. मु.स. रामदासजी तोडासे, यशवंत पाटील लोंढे,देवांदजी डोर्लीकर,पो.पा.विनोदजी सयाम,बाळूपाटील बोरकर,ग्राम विकास अधिकारी कापगते,व गावकरी मंडळी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांना महाराष्ट्रातून टॉप १० जिल्हा परिषद सदस्यामध्ये प्रथम उत्कृष्टजिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना दि. ७ .३.२०२२ ला पुणे येथे केंद्रीय मंत्री महोदय मा.श्री .कपिलजी पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल आज गावकर्यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.