ताज्या घडामोडी

लॉकडाउन काळातील आलेले अव्वाच्या सव्वा बिल माफी न करण्याच्या ठाकरे सरकार विरोधात आम आदमी पार्टीचे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन

आप कडून शिवसेना वचननाम्या ची होळी

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या जाहीरनाम्यात ज्याला ते वचननामा म्हणतात त्यात त्यांनी ३०० युनिट विज वापर करणाऱ्यांना वीज दर ३०% टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सामान्य वीज दर कमी करणे तर सोडाच परंतु १ एप्रिल पासून २०% वाढवून लॉकडाउन काळात राज्यातील बहुतांश जनतेला जे अव्वाच्या सव्वा वीज बिल आले त्याला देखील कसलीही माफी किंवा सवलत देणार नाही असे काल जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अहोरात्र जप करणाऱ्या शिवसेनेने या महागड्या विजबिलांबाबत अत्यंत दुटप्पी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केली आहे. शिवराय दुष्काळ किंवा कुठल्याही अस्मानी संकटांच्या वेळी प्रजेची काळजी घेत असत, त्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेत होते, याउलट त्यांच्या नावाने चालणारा शिवसेना पक्ष आणि अहोरात्र शिवरायांचा जप करणारे उद्धव ठाकरे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत आहेत. कोरोनामुळे अनेक लोकांच्यावर बेरोजगारी आणि मंदीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाउन काळातील अवाजवी अतिमहागड्या विजबिलात माफी/सवलत न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे.

जून महिन्यापासून आम आदमी पार्टी वीज दर कपात आणि लॉकडाउन काळात वीज बिल माफीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. श्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली म्हणून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, परन्तु पोलिस प्रशासनाने सुध्दा दाखल घेतली नाही, त्यामुळे आज आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन तसेच शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीतील वचननामा जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीचे प्रदेश संयोजक रंगा राचुरे यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आहे. जोपर्यंत राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार प्रमाणेच राज्यातील नागरिकांना २०० युनिट पर्यंत वीज माफी देत नाही तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील.

आजच्या आंदोलनात राज्य समिति सदस्य व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाद्यक्ष जगजीत सिंग, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर सहसयोजक प्रशांत निलाटकर, राज्य युवा अघाड़ी सदस्य कृतल वेलेकर, नागपुर युवा अघाड़ी संयोजक गिरीश तितरमारे, नागपुर सहसचिव संजय सिंग, नागपुर युवा आघाडी सचिव प्रतीक बावनकर, आकाश कावले, लक्ष्मीकांत दांडेकर, विकास घराडे, अफसर शेख, जय प्रकाश पवनीकर, हिदायत आली, अफदुल अफिझ शेख, शरीफ अहमद, विजय धकाते, किशोर चीमुरकर, जहागीर, संजय जिवतोडे, विजय चापले, रवींद्र घिदोडे, संजय अनसारे, गुंनु बेहर, दिलीप बिडकड, चंद्रशेखर लोखंडे, दिलीप चोखद्रे, संतोष वैद्य, बंसोड काका, निखिल मेंनवडे, अरविंद पौनीकर, रोशन डोंगरे, जय चोहान, सचिन लोनकर, सुरेंद्र बरगडे, जगजीत सिंग, भूपाल सावरकर निलेश गाहलोट, रविकांत वाघ, दीपक भातखोरे, हेमंत पांडे, वैशाली डोंगरे, दिपाली पाटील, अमोल हड़के, स्वीटी इंदुरकर, माधुरी नहाते, शिला श्रीवास्तव, विना भोयार, शोयेब वर्शी व नागरिकांनसह कार्यकर्ते उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close