ताज्या घडामोडी

आईची मूर्ती स्थापण करून सुनिल जनबंधुंनी केला वेगळाच आदर्श निर्मान

उपसंपादक: विशाल इन्दोरकर

म्हणतात ना की आई वडिलाचे उपकार कधी फेडू शकत नाही व परतफेड सुद्धा करू शकत नाही. परंतु आई वडिलांनी मुलांसाठी काही केले ते विसरावे सुद्धा नाही . कारण त्यांच्यासारखे कुणी नाही .
एक उदाहरण म्हणजे सुनिल जनबंधु , ते सध्या नागपूर मध्ये विशेष मुलांच्या घरी जाऊन क्लासेस घेतात . किरायाच्या घरात राहत असून त्याच जीथे स्थान तोच घर म्हणून आपल जगत असतात . गरिब घरातून आहेत लहान असतांना वडिल वारले व आईने तीघा मुलांना किती हलाखीच्या जीवणातून मार्ग काढले त्याचीच रतफेड म्हणून लहानपणी पासून आई बद्दल खुप विचारीक व्यक्ति. प्रत्येक गोष्ट ते अनुभवातुन शिकत गेले व काही वेगळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.
मोठ्या बहिण भावाचं लग्न कठीन परिस्थिती करूण दिल कारण आई हृदय विकार व लकव्यानी ग्रासली होती व २०१० ला वारली . खुप मोठा डोंगर उभा राहिला सुनिल जनबंधु समोर . तरी न डगमगता न घाबरता आल्या परिस्थितीशी संघर्ष करूण मार्ग काढत राहीला . आईनी जन्म दिला , वडिलांची व कशाचीच कमी होऊ दिले नाही व ती भूतकाळ किती त्रासदायक होता याची जाणीव करत आईसाठी काही वेगळे करावे असे मणात ठाणून त्यांनी आईच्या नावाने “मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्था ” स्थापन केली , त्या निमित्ताने सामाजिक कार्य करत असतात व लहाण पणी पासून जे मणात असलेले स्वप्न म्हणजे “आईची मूर्ती स्थापण करावी” हे स्वप्न आज पूर्ण करून दाखवीले. त्या निमित्ताने आईचे प्रकट दिन म्हणून राहते किराययच्यआ घरी साजरा करण्यात आला. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे .
सुनिल जनबंधु यांनी आईवर लिहीलेली आठवण आईची या कवितेतू काही ओळी –

नऊ महिने नऊ दिवस दु:ख सहण केलीस , त्या वेदणेने तरी जन्म मला देलीस .
दुधाची ती पहिली गोळी राहे अमृतावानी, आठवण येते मला , त्या गोष्टिची , त्या वात्सल्याची , त्या आईची ..

सांग आई तु कुठे , सोडून मला गेलीस ?
तुझ्या आठवणीने माझे डोळे ओले केलीस .
कसे फेडू उपकार दुदाचे? हाच प्रश्न माझ्या मणी.
तुच नारी जगतामधली , सर्व सुखे आई आई

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close