ताज्या घडामोडी
योगनृत्य परिवारचा चंद्रपूर मनपाच्या “आम्ही वृक्षप्रेमी ” स्पर्धेत सहभाग

जनजागृतीसाठी लक्षवेधक रॅलीचे आयोजन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर मनपाने आयोजित केलेल्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत अनेक सामाजिक संस्था व संघटनेनी भाग घेतला असून मागच्या वर्षी उत्तम कामगिरी करत पुरस्कार प्राप्त करणाऱ्या योगनृत्य परिवार सिध्दीविनायक मंदिर चंद्रपूर यांनी या वर्षी देखील उपरोक्त स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असल्याचे गट प्रमुख रंज्जू दिलीप मोडक यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून जनजागृतीसाठी या परिसरातील महिला व पुरुष मंडळींना सोबत घेऊन एका लक्षवेधक रॅलीचे आज आयोजन केले होते.सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या गटाने स्वच्छता अभियानात गत वर्षी आपला सहभाग नोंदविला होता.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.