राजाराम येथे आज व उद्या रंगणार रामनवमी उत्सव
भव्य श्रीराम विवाह सोहळा व शोभायात्रा आयोजित
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
राजाराम :- विश्व हिंदू परिषद अहेरी जिल्ह्यातील बजरंग दल राजाराम शाखेच्या वतीने भव्य श्रीराम नवमी कार्यक्रम दि. 9 व 10 एप्रिलला आयोजित करण्यात आले आहे.
अहेरी प्रखंड राजाराम शाखेच्या वतीने राजाराम ग्राम पंचायत कार्यालय च्या भव्य पाठणगांवर श्रीराम नवमी दिनानिमित्त भगवान श्रीराम विवाह उत्सव सोहळा कार्यक्रम आयोजित केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही राजाराम येथे हनुमान मंदिरात चैत्र शुक्ल एकादशी ते नवमी पर्यंत चालणाऱ्या श्री राम नवमी उत्सव समिती द्वारे घटस्थापना,रामजन्म उत्सव सोहळा, रामविवाह सोहळा,श्री हनुमानस्वामी व्रत धारण सोहळा,कांकड आरती, भजन कार्यक्रम, रामलीला, श्रीराम-जानकी यांचं भव्यदिव्य महारॅली,गोपाळकाला, महाप्रसाद हे कार्यक्रम संत, पंडित-पुरोहित यांच्या साक्षीने पार पडणार आहे.तरी होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमास राजाराम व परिसरातील रामभक्त भाविकानी तन-मन-धनाने सहकार्य करून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून श्रीराम भगवानाचे दर्शन प्राप्त करावे असे आवाहन श्री. राम नवमी समिती , बजरंग स्वामी मंडळ राजाराम व बजरंग दल शाखा राजाराम च्या वतीने करण्यात येत आहे.