एसबीआय शाखेतील गैरवर्तन प्रकरणाला नवे वळण

ए
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अहमद अन्सारी 10 ऑगस्टपासून तिसऱ्यांदा आमरण उपोषणावर
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मानवत शाखेत 11 नोव्हेंबर 2024 रोजी सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) आणि सुरक्षा रक्षक (Security Guard) यांनी खातेदार असलेल्या अहमद अली अन्सारी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा अपमान केला. तसेच त्यांचा हात धरून बँकेच्या बाहेर काढल्याचा आरोप अन्सारी यांनी केला आहे.

या प्रकरणी अन्सारी यांनी विविध स्तरांवर अनेक तक्रारी दाखल केल्या. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्याय मिळावा यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन वेळा आमरण उपोषण केले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित यंत्रणेला पत्राद्वारे आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा अन्सारी यांनी केला आहे.
यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अहमद अली अन्सारी यांनी 10 ऑगस्ट 2026 पासून तिसऱ्यांदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित बँक शाखेतील अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांच्याविरुद्ध प्रशासन व बँक व्यवस्थापन कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित बँक प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.









