प्रख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार यांना”विरांगणा राणी लक्ष्मीबाई” पुरस्कार बहाल
साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळीने केले त्यांचे अभिनंदन!
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
जागतिक महिला दिनी पाचवडच्या सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना सुतार यांना नवी दिल्ली येथून”केशव माधव ट्रस्ट” च्या वतीने “विरांगणा राणी लक्ष्मीबाई” या पुरस्काराने गौरवित केले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय व अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात येतो .पुरस्कार प्राप्त कु. अर्चना सुतार ह्या महाराष्ट्रातील नामवंत महिला सहज सुचलं व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्य असून त्यांनी आज पर्यंत कवितेच्या माध्यमातून कोरोना काळात जनजागृती केली. अनेक देशातील व भारतातील अनेक राज्य व जिल्ह्यातील अनेक संस्थांनी त्यांना त्यांच्या कार्याबाबत विविध पुरस्कार देवून पुरस्कृत केले आहे. त्या स्वतःचे आयुष्य कवितेच्या माध्यमातून समाजासाठी व्यतीत करीत आहेत. पेशाने शिक्षिका असलेल्या पाचवडच्या(सातारा) सुप्रसिद्ध कवयित्री कु.अर्चना सुतार यांना त्यांच्या कार्याबद्दल “विरांगणा राणी लक्ष्मीबाई” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कु.अर्चना सुतार यांना उपरोक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.दरम्यान सहज सुचलं नागपूरच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे,राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूर -गडचिरोली जिल्हा सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक कोठारीच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे, भद्रावतीच्या हिरकणी पुरस्कार प्राप्त सुपरिचित समाजसेविका किरण साळवी , मूलच्या जेष्ठ साहित्यिका स्मिता बांडगे , चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडच्या संघटिका वंदना हातगांवकर, सुपरिचित समाजसेविका छबूताई वैरागडे,
सहज सुचलं काव्यकुंच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, नागपूरच्या मेकअप आर्टिस्ट कु.कल्याणी सरोदे , चंद्रपूर नगरीच्या सहज सुचलं निवेदिका अंजूताई पिंपले, तुकुम चंद्रपूरच्या समाजसेविका मंथना नन्नावरे,गडचांदूरच्या उज्वला नगराळे व गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर यांनी कु.अर्चना सुतार यांचे अभिनंदन केले आहे.