कामगार दिनानिमित्त कामगाराने वाटले शालेय साहित्य
तुरा येथील ऊसतोड कामगार रंगनाथ खिल्लारे यांचा स्तुत्य उपक्रम .
जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती तुरा येथील जि प शालेत मोठ्या ऊत्सहात साजरी करण्यात आली यावेली ऊसतोड कामगार रंगनाथ खिल्लारे यांच्या वतिने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालूक्यातील तुरा येथील जि प शालेत मंगलवार दि १ आगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या ऊत्सहात साजरी करण्यात आली. तसेच १ आगस्ट हा दिवस कामगार दिवस म्हणून सुध्दा साजरा केला जातो त्या निमित्ताने तुरा येथील ऊसतोड कामगार रंगनाथ खिल्लारे यांनी वर्ग १ ते८ वी च्या विद्यार्थांना वह्या व पेन वाटप केल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानव विकास लोकसेवा केंद्राचे अरविंद हमदापुरकर यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी सरपंच सतिषराव आडसकर हे होते यावेली पत्रकार धनंजय आडसकर, उपसरपंच भागवत ढाणे, शा व्य समितीचे अध्यक्ष माणिक ढाणे, उपाध्यक्ष बालासाहेब चालक,माजी उपसरपंच हरिभाऊ जाधव, ग्रा पं सदस्य बाजीराव चालक, ग्रा पं सदस्य माणिकराव मोरे, ग्रा पं सदस्य रामेश्वर ढाणे,रंगनाथ खिल्लारे, लक्ष्मन गायकवाड, रवि चालक, सचिन खिल्लारे, आदींची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन हनुमान जाधव यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पामे यांनी मानले.