ताज्या घडामोडी

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग

अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

लग्नाचे आमिष दाखवून, अश्लील फोटो व व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत एका 32 वर्षीय विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाथरी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी हमीद शेरखान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
तक्रारदार महिला (वय 32, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2017 मध्ये त्यांची भेट आरोपी हमीद शेरखान (रा. पोहे टाकळी, ता. पाथरी, जि. परभणी) याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने महिलेला चंद्रपूर येथील रामडा तलाव गार्डन येथे भेटायला बोलावले. तेथे आरोपीने जबरदस्तीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि गुपचूप फोटो व व्हिडिओ काढले.
त्यानंतर हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवून तसेच कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने महिलेचे सातत्याने शारीरिक शोषण केले. या मानसिक त्रासामुळे पीडित महिला तीव्र नैराश्यात (Depression) गेली होती व तिच्यावर डॉक्टरांचे उपचारही सुरू होते.
लग्नाचे खोटे आमिष आणि फसवणूक
आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन चंद्रपूर, नागपूर येथील विविध हॉटेल्स आणि इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मात्र, महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता, आरोपीने आधीच लग्न केले असल्याचे समोर आले. यावरून विचारणा केली असता आरोपीने तिला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली…
विविध कलमान्वये गुन्हे दाखल
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलिसांनी दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी आरोपी हमीद शेरखान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (Atrocities Act) च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *