ताज्या घडामोडी

माँ .बागेश्वरी साखर कारखान्याचे कार्य जलदगतीने

कारखान्याने गाळप क्षमता वाढवावी ;त्यासाठी जे सहकार्य लागेल त्यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन – जिल्हाध्यक्ष केकान

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परतूर तालुक्यातील काही राजकीयनेतेमंडळीतून लोक विनाकारण वरफळ येथील माँ. बागेश्वरी साखर कारखान्याला व प्रशासनाला त्रास देण्यासाठी उपोषण करण्याची व शेतकरी विरोधी धोरण राबवत आहेत ज्या लोकांचा स्वतःचा उस नाही ज्यांनी स्वतः कधी कारखान्याच्या हितासाठी कुठला आंदोलन केलं नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं नाही आणि आज आपल्या तालुक्यामध्ये माँ. बागेश्वरी साखर कारखाना हा मराठवाड्यात नंबर एक चा भाव देत आहे .

आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी मिळून मा. शिवाजीराव जाधव यांना विनंती केली की स आपण साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी व गाळप क्षमता वाढवण्यासाठी आपणास जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यासाठी ऊस बागायतदार सर्व शेतकरीबांधव आपणास सहकार्य करण्यास तयार आहेत आम्ही स्वतःहून कारखान्याला एकरी दहा हजार रुपये प्रमाणे कॅपॅसिटी वाढवण्यासाठी देण्याचे ठरवलेले आहे . आम्ही शेतकरी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या दारात जाऊन कारखान्यासाठी आम्हाला पैसे मागतात असे गाऱ्हाणे केलेले नाही . परंतु काही लोक राजकीय श्रेय घेण्यासाठी व आपला स्वार्थ साधण्यासाठी कारखान्यास वेठीस धरत आहेत माझी तालुक्यातील पुढाऱ्यांना एकच विनंती आहे ज्याप्रमाणे लोणीकर साहेबांनी कॅपॅसिटी वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे . त्याप्रमाणे शिवाजीराव जाधव यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे असे आमचे सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे व कारखान्याच्या बाबतीत शेतकऱ्याची काहीही तक्रार नाही आजपर्यंतचा तालुक्याच्या इतिहासात साखर कारखान्यांनी दिलेला भाव हा सर्वोत्तम असून सन हा 2020 21 मध्ये कारखान्याने विक्रमी गाळप करून सहा लाख टनांचे उद्दिष्ट पार केलेले आहे आणि याही पुढे जाऊन सन 2021 22 हंगामामध्ये कारखान्याने आठ लाख टनाचे गाळप उदिष्ठ ठेवलेले आहे व त्यासाठी नवीन लागवडीस परवानगी दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने कारखान्यास दोष देण्याचे कारण नाही राजकीय पुढाऱ्यांच्या पापामुळे आत्तापर्यंत शेतकरी त्रासलेले आहेत यापुढे तरी कारखान्यात कोणीही नाक खुपसू नये व झालेल्या निर्णयास शिवाजीराव जाधव यांनी ठाम राहावे तालुक्यातील सर्व शेतकरी रयतशेतकरी संघटना खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे कारखान्याच्या बाबतीत आपण केलेले नियोजन एक नंबरचे आहे .परतूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनराव लोणीकर बागेश्वरी साखर कारखान्याच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत तरी आपणास विनंती आहे की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आपण कारखान्यास योग्य तो न्याय प्रशासन म्हणून द्यावा अश्या मागण्याचे निवेदन एका निवेदनाद्वारे परतूर उप विभागीय अधिकारी जाधव यांना दिले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close