परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर येथे दत्त जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे (covid-19) कोरोणाच्या शासकीय निर्देशांचे पालन करत श्रीसाई स्मारक समिती, पाथरीच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दुपारी दोन ते चार कीर्तन तसेच सायंकाळी ४:३० वाजता परम साईभक्त डॉक्टर एल आर मानवतकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुमुद मानवतकर यांचे शुभ हस्ते ध्यान मंदिरातील दत्तगुरुंना प्रथमत:च महाअभिषेक झाला.

पूजेचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न उमेश गुरू जोशी सावरगावकर यांनी केले. सायंकाळी ५:४५ वाजता श्रीदत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी दत्तगुरूंचा पाळणा, पूजा आणि इतर कार्यक्रम संपन्न झाले. नंतर धुपारती झाली या कार्यक्रमाला सौ सुवर्णा भोकरे, समितीचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुलराव चौधरी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रज्ञा चौधरी, श्रीमती आशाताई चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी ना के कुलकर्णी, मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी, प्रताप आम्ले, आई तुळजाभवानी महिला अर्बन बँकेचे व्यवस्थापक मिलिंद मनेरे, योगेश इनामदार वाळुजकर शास्त्री, सुधाकर बेदरे व इतर भक्तजन उपस्थित होते. अशी माहिती श्रीसाईबाबांचे पुजारी अजय गुरु पाथरीकर शास्त्री यांनी दिली.