पेट्रोल डिझेल,गॅस तथा रासायनिक खते यांच्या वाढीव किमती मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गोंडपीपरीच्या वतीने दिले निवेदन
शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे गोंडपिपरी
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका गोंडपिपरी कार्याध्यक्ष नितेश मेश्राम यांच्या नेतृत्वात आज दिनांक 17 मे रोज सोमवारला मा.तहसीलदार साहेब गोंडपिपरी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर ,
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,
पंतप्रधान भारत सरकार दिल्ली यांना पेट्रोल डिझेल गॅस व रासायनिक खते यांच्या किमती मागे घेण्याबाबत आज दिनांक 17 मे रोज सॊमवारला राष्ट्रवादी कांग्रेस कार्याध्यक्ष गोंडपीपरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. रासायनिक खताच्या किमतीमध्ये 40 टक्के वाढ करून केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला अजून आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. रासायनिक खतांच्या वाढीसोबतच पेट्रोल ,डिझेल गॅस ची दरवाढ करण्यात आली.ही दरवाढ कमी करण्याऐवजी परत भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहे शंभर रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेल्या केंद्र सरकारने आज जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे.खताच्या किमती भरमसाठ वाढण्याचं काम भारत सरकारने केले आहे जो डी ए पी 1185 रुपयाला मिळणारे डीएपी खताचे भाव 715 रुपये वाढवून आता शेतकऱ्यांना 1900 रुपये मिळणार आहे .आता पोट्याशच्याही किमती वाढल्या देशातला खताची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे ह्या करीता आज निवेदन देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस गोंडपीपरी चे कार्यध्यक्ष नितीन मेश्राम यांनी दिली आहे.
यावेळेस नितीन मेश्राम,कुणाल भाऊ गायकवाड, संदीप ईटेकर,सुमित मेश्राम, सहित अन्य कार्यकर्ते निवेदन देतांना उपस्थित होते.