५४८ बी राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी लोकवर्गणीतून सुरू
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातून सोनपेठकडे जाणारा ५४८ बी या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती अखेर शेतक-यांनी लोकवर्गणी करून गुरूवार पासून सुरू केली आहे.
पाथरी हुन सोनपेठकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अगदीच दयनीय झालेली असतांना या विषयी या राष्ट्रीय महामार्गासाठी नियुक्त असलेले अधिकारी नेमके कोण? ते कधी तरी या महामार्गावरून फिरकले का? का ते जाणिव पुर्वक या मार्गाच्या किमान डागडूजी कडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत? असे एक ना अनेक प्रश्न या महामार्गाची अवस्था पाहिल्या नंतर मनात उपस्थित होत असतात.
या राष्ट्रीय महामार्गा वरुन प्रचंड मोठी वाहतुक आहे. परंतू हा प्रस्तावित महामार्ग आहे की एखादी अडथळ्यांची शर्यत असनारा रस्ता आहे हेच समजून येत नाही. आता साखर कारखाण्यांचा हंगाम सुरू झाला आहे. या महामार्गावरुन गंगाखेड शुगर्स,२१ शुगर्स सायखेडा,योगेश्वरी शुगर्स, लिंबा. बागेश्वरी शुगर्स,लक्ष्मी नृसिंह एलपी,वैद्यनाथ परळी,रेणूका शुगर्स पाथरी,बजाज,माजलगाव, समृद्धी शुगर्स,तिर्थपुरी अशा सात आठ साखर कारखाण्यां साठी शेतक-यांच्या ऊसाची वाहतून या महामार्गा वरुन होत असते.
दर वर्षी ऊसाचा हंगाम सुरू झाला की या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी लोकवर्गणीतूनच होत असते. आज या घडीला रिकामे वाहन पण धड चालवता येत नाही. तर अनेक जन चाळीस पंन्नास किमीची दुरचे अंतर कापत प्रवास करतात. मात्र आता ऊसाचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने या महामार्गा शिवाय पर्यायच नसल्याने. आणि या महामार्गाचे जे कोणी अधिकारी आहेत ते जाणिव पुर्वक डागडूजी साठी टाळाटाळ करत असल्याची भावना शेतकरी,सामान्य आणि वाहन धारकां मधून व्यक्त होत आहे. नविन महामार्गाचे काम राहू द्या पण किमान डागडूजी तरी करा हो साहेब..! असा अर्तटाहो शेतकरी फोडत आहेत.
निसर्गाने इतर पिके हातची धूऊन नेली किमान दोन पैसे ऊसातून मिळतील ही अपेक्षा ऊस उत्पादक ठेऊन आहेत. त्यात ही आता हा रस्ता ऊस वाहातूकी साठी शेतक-यांना लोकवर्गणी करून करावा लागतोय. आस्मानी संकटाने तर पिच्छा धरलाय आता अधिकारी रुपी सुलतानी संकट शेतक-यांच्या पाठीशी लागलेय. जे चार पैसे हातात मिळायचे तेही या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजी साठी लोकवर्गणी म्हणून द्यावे लागणे या पेक्षा दुर्दैव ते अजून काय म्हणावे अशी भावना शेतकरी जाहिर पणे व्यक्त करत आहेत.
गुरूवार १७ नोव्हेंबर पासुन दोन पोकलेन मशीन च्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी लोकवर्गणीतून सुरू केल्याचे शेतक-यांनी सांगितले. या विषयी या महामार्गाच्या अधिका-यांनी जनाची नाही तर मनाची थोडीशी बाळगून या महामार्गाच्या दुरुस्ती कडे लक्ष द्यावे ज्या मुळे शेतक-यांच्या परिवाराचा किमान आशिर्वाद तरी लागेल अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.