ताज्या घडामोडी
आमदारांनी चिखल तुडवत केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहानी
नुसती पाहनी नको तर तात्काळ मदत द्या साहेब गावातील शेतकऱ्यांची मागनी.
प्रतिनिधी: बालाजी कऱ्हाळे वसमत
विधानसभेतील असलेल्या सोन्ना,सावंगी,ब्राह्मणगाव येथील पूर परिस्थिती व पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी दि. 30/09/2021 रोजी प्रत्यक्ष चिखल तुडवत नुकसान झालेल्या शेतकऱ्यां सोबत पूरग्रस्त भागाची पाहणी करून गावातील सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के टक्के नुकसान भरपाई मिळवून देईल असे आश्वासन दिले व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना फोन करून गावातील सर्व शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करुन अहवाल प्रशासना प्रर्यंत पाठवण्याचे सांगितले.
नुसती पहानी नको मदत दया अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.