ताज्या घडामोडी

गावातील प्रतिष्ठितांकडून शालेय शिक्षण समितीच्या नवनिर्वाचितांचा येथोचीत सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

खेर्डा महादेव येथील शालेय शिक्षण समितीच्या व्यवस्थापन मंडळावर अध्यक्ष म्हणून श्री रतन बालासाहेब वाहेळ, व सदस्य म्हणून श्री शौकतखाॅं बिस्मिल्लाखाँ पठाण यांची निवड झाल्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री गणेशराव लांडगे व प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांच्यावतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रसंगी गावातील प्रतिष्ठित शेख अफसर, तुकाराम ढवळे, शेख मुबारक, प्रमोद होगे ग्रामपंचायतचे डाटा एन्ट्री ऑपरेटर अशोक गायके, पाथरी अर्बन बँकेचे धनंजय आमले, उमेश आमले, सर्जेराव ढवळे, अण्णासाहेब आमले, हाशम शेख, राहुल वाहेळ, सादिक शेख, रणजीत दादा आमले, खाजामियाॅं शेख व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी बोलताना श्री गणेशराव लांडगे यांनी नवनिर्वाचिकांचे अभिनंदन करुन गावकऱ्यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी भरगच्च शुभेच्छा दिल्या. अशी माहिती श्री विनायक आमले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close