ताज्या घडामोडी

हकीमी कॉन्व्हेन्ट चंद्रपूर येथे गुरुवर्यास नमन करून शिक्षक दीन साजरा

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयुष्याला आधार,आकार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या गुरुवर्यास नमन करून शिक्षक दीन साजरा करण्याकरिता हकीमी कॉन्व्हेन्ट तुकूम,चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दीन साजरा करून हकिमि कॉन्व्हेन्ट येथील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर शिक्षक दीन साजरा करण्याकरिता तुकूम परिसरातील नगरसेवक सुभाष भाऊ कसंगोत्तीवर उपस्थित होते तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.मदन भैसारे,उपाध्यक्ष संगीता ताई मामिलवार,सहसचिव सीमा ताई वानखेडे संघटक प्रतिभा ताई मडचापे चंद्रपूर शहर अध्यक्ष श्वेता ताई फंदी, सद्यस्या लक्ष्मी ताई तावाडे,लक्षिक रामटेके व इतर पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close