ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

परभणी, दि. 28/08/2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे सकाळी मुंबई विमानतळावरून विमानाने नांदेडकडे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी १२.४५ वाजता परभणी येथील पोलीस परेड मैदान हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल.

यानंतर दुपारी १.०० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २.०० वाजता विविध शिष्टमंडळांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता मोटारीने पोलीस परेड मैदान हेलिपॅडकडे प्रयाण करून, दुपारी ३.१५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे रवाना होतील.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close