छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठाणच्या वतीने मार्केट कमेटी सभापती बेंडे यांचा सत्कार
प्रतिनिधी:बालाजी कऱ्हाळे वसमत
कृषीउत्पादन बाजार समिती सभापती मा. श्री. तानाजीराव बेंडे पाटील आज सकाळी गिरगांव येथे राजु भैय्या नवघरे प्रतिष्ठाणच्या वतीने गिरगांव येथे दि.१७ रोजी आयोजित केलेल्या जनकल्याण आरोग्य कार्यक्रमाच्या संदर्भात गिरगांव सर्कल च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती तानाजी पाटील बेंडे उपस्थित राहिले असता छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठाण च्या वतीने बेंडे यांचा शेतकऱ्याचे अशूड हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला या वेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शिवश्री बालाजी पाटील क-हाळे,कल्याणराव पाटील नादरे मा.व्हाईस चेरमण,सुनील पाटील नादरे सोसायटी चेरमण,प्रमोद नादरे पत्रकार,गौतम दवणे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग व प्रतिष्ठाणचे सदस्य शंकर क-हाळे,शिवाजी क-हाळे,वैभव क-हाळे,अर्जुन क-हाळे,नामदेव क-हाळे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.