ताज्या घडामोडी

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वर पोलीस प्रशासनाची कारवाई

उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची कार्यवाही

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

मानवत शहरात संचारबंदी लावण्यात आल्यानंतर काही मंडळी युवा वर्ग मेडिकल व दवाखानाच्या नावाखाली बिनधानस्तपणे शहरात फिरतांना दिसून येत आहे .
मानवत पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणा-यावर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, ट्रॅफिक पोलीस नरेंद्र कांबळे, नारायण सोळंके ,मंगल पवार,चालक कैलास खरात व होमगार्ड हाळ्णे,केदारे यांनी नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करावे .घरीच राहून सुरक्षित रहा,अतिआवश्यक कामासाठीच घराच्या बाहेर निघावे.घराबाहेर निघताना माक्सचा वापर करावा ,सतत सँनिटाईजरचा वापर करावा, आणि सामाजिक अंतर (सोशल डिसटन्स ) ठेवावे असे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी वारंवार नागरिकांना समजावून सांगत होते. दरम्यान विनाकारण फिरणा-या व विना मास्क लोकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close