ताज्या घडामोडी
विदर्भातील अनेक आशा वर्कर व गट प्रवर्तक मुंबईच्या आंदोलनात सहभागी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मुंबई आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांतील आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जीआर काढा ही त्यांची एकमुखी मागणी असून आंदोलनाला एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला असल्याचे काॅ.विनोद झोडगे व काॅ रविन्द्र उमाठे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना सांगितले.दरम्यान शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतली नाही.चंद्रपूरात ही त्यांचे काही दिवसांपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आजचा 38 वा दिवस असल्याचे आयटकचे दिग्गज नेते रविन्द्र उमाठे यांनी या प्रतिनिधीला सांगितले.