ताज्या घडामोडी

आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटात स्व नितीन महाविद्यालयाची बाजी

बहिर्जी स्मारक महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आजादी का अमृत मोहत्सव अंतर्गत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत स्व नितीन महाविद्यालय पाथरी येथे आयोजीत आंतरमहाविद्यालयीन ‘ड’ झोन कुस्ती स्पर्धेत स्व नितीन महाविद्यालयाचा कुस्तिगिर पांडूरंग सुदामराव श्रावणे याने बाजी मारत न्यू मॉडेल डिग्री महाविद्यालय,हिंगोलीच्या अदनान शेख याला चितपट करत ८६ किलो वजनी गटात अजिंक्यपद पटकावले.
येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या भव्यदिव्य क्रिडा हॉल मध्ये मॅट वरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगोली ,परभणी जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयाच्या ३५ कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात गुरूबुद्धी स्वामी महाविद्यालयाचा भुजंग खंदारे प्रथम आला तर कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा कपील पाटील व्दितीय आला. ६१ किलो वजनी गटात के के एम महाविद्यालयाचा सागर कदम प्रथम आला त्याने प्रतिस्पर्धी शारदा महाविद्यालय परभणीच्या शुभम मुटकुळे याला चितपट केले. ६५ किलो वजनी गटात तोष्णीवाल महाविद्यालयचा अदिनाथ जाधव प्रथम आला. त्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाविद्यालय,राणीसावरगाव च्या गोपाळ बिडगर याला चितपट केले. ७० किलो वजनी गटात बहिर्जी स्मारक महाविद्यालय,वसमत चा अमोल मुळे प्रथम आला त्याने नागनाथ महाविद्यालय औंढ्याच्या वैभव आडणे ला चितपट केले. ७४ किलो वजनी गटात बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्रशांत कदम याने प्रथम क्रमांक पटकावला त्याने कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठच्या सुनिल पांचाळ याला चितपट केले. शेवटी ८६ किलो वजन गटातील कुस्तीत स्व नितीन महाविद्यालयाच्या पांडूरंग श्रावने याने हिंगोलीच्या न्यू मॉडेल डिग्री महाविद्यालयाच्या अदनान शेख याला अवघ्याव विस सेकंदात आस्मान दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. या कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाने पटकावले.
तत्पुर्वी या स्पर्धेचे उदघाटन छत्रपती पुरस्कार विजेते डॉ माधव शेजूळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर एस फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत ‘ड’ झोन चे सचिव मिनानाथ गोमचाळे,आयक्यूएसीचे प्रा भारत निर्वळ, आयोजक मंडळाचे क्रिडाविभा प्रमुख प्रा डॉ अंकुश सोळंके यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा डॉ माधव शेजुळ प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. या स्पर्धे साठी राष्ट्रीय पंच गोविंद नवनाथ घाडगे,शेख नफीजा यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण स्पर्धेच्या समारोपा नंतर प्राचार्य डॉ आर एस फुन्ने,डॉ मिनानाथ गोमचाळे आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदक देऊन करण्यात आले.
या स्पर्धे साठी परभणी,हिंगोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील संघव्यवस्थापक म्हणून डॉ आनंद भट हिंगोली,डॉ चंद्रकात सातपुते गंगाखेड,डॉ ज्योतीराम चव्हाण वसमत, डॉ हेमंत शिंदे सेनगाव, नसीफ पैलवान हिंगोली,डॉ संदिप लोंढे हिंगोली, डॉ साहेबराव देवकते औंढा, प्रा बुरकुंडे पुर्णा, डॉ ज्ञानेश्वर गिरी परभणी,डॉ संतोष कोकीळ परभणी,डॉ पवन पाटील मानवत, डॉ कमलाकर कदम सेलू, डॉ शाम पाठक परभणी,डॉ निरज आकमार वसमत, डॉ माधव कदम परभणी यांची उपस्थिती होती.
उदघाटनिय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा तुळशीदास काळे यांनी केले तर बक्षिस वितरण समारंभाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रा डॉ माधव कदम यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close