एटापल्ली पंचायत समितीत रा.काँ. चा झेंडा फडकला

निवडणुकीत होती चुरस
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गत 19 जुलै रोजी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली पंचायत समितीचे सभापती शालीकराम गेडाम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवार 20 आगष्ट रोजी सभापती पदासाठी निवडणूक झाली यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एटापल्ली पंचायत समितीवर झेंडा फडकाविले.
चार विरुद्ध तीन अशा चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे बबिता मडावी सभापती पदासाठी निवडून आली.
निवडणुकीची प्रक्रिया तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी राबविले यावेळी संवर्ग विकास अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर गव्हाणे व कर्मचारी उपस्थित होते पोलिसांचा कडक बंदोबस्तही होता.
एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आविसने कंबर कसले होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसने धूर चारले.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने एटापल्ली पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी नवनियुक्त सभापती बबिता मडावी यांच्या गळ्यात हार घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
सभापती निवडीनंतर रा.काँ. च्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करून जल्लोष व आनंद व्यक्त केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी निवडणुकीची प्रक्रिया राबविले. सोबत संवर्ग विकास अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर गव्हाणे व कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युदिष्टीर बिश्वास, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, लक्ष्मण नरोटी, महिला तालुकाध्यक्ष निर्मला मडावी, शहराध्यक्ष पौर्णिमाताई श्रीरामवार, विनोद पत्तीवार, रामजी कत्तीवार, प्रसाद नामेवार, मिथुन जोशी, श्रीनिवास विरगोनवार, अमोल मुक्कावार,विष्णू राय, सांबय्या हीचामी,शैलेश पटवर्धन, नागेश करमे, सुरेंद्र अलोने, मखमुर शेख, महेश अलोने, योगेश दंडीकवार आदी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.