पप्पुराज शेळके राजधानी दिल्लीत पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
13 डिसेंबर..2022.
मानवी हक्क अभियानचे परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके हे गेल्या 22 वर्षापासून गायरान धारक,दलित आदिवासी बहुजन वंचित, कष्टकरी व महिला सक्षमिकरण व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी करत असलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथील भारतीय सामाजिक संस्थान (ISI) येथील सभागृहात ॲक्शन एडचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी मा.संदीपजी चाचरा, भारताचे मुख्य प्रवर्तक तन्वीरजी काजी,ॲक्शन एड च्या समन्वयक दिपालीजी यांच्या शुभ हस्ते पप्पुराज शेळके यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
देशाची राजधानी दिल्ली येथील संपूर्ण भारतातील 25 राज्यातून 150 प्रमुख मानव अधिकार रक्षकाचे राष्ट्रीय सम्मेलन ॲक्शन एड ंच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
पप्पुराज शेळके यांना यापूर्वी राज्यस्तरीय 7 पुरस्कार, बेटी बचाव फाॅउंडेशनचा आंतरराष्ट्रीय 1 पुरस्कार,तेलंगण राज्याच्या वालुरी फाॅउंडेशनचा 2021 चा रोख 5 हजार रूपये व सन्मान चिन्ह हरियाणाचे राज्यपाल दत्तात्रय बंडारू यांच्या देण्यात आला होत.आज 13 डिसेंबर 2022 चा देशाची राजधानी नवी दिल्लीतील पुरस्कार परभणी जिल्हासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.
मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनयु दिल्लीचे प्रो डाॅ मिलिंद(नाना) अवाड सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असुन त्यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव गौतम मुंडे सर,मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले, बीड जिल्हा अध्यक्ष राजेश घोडे , पि एन रणखांब,संतोष लोखंडे, भारत बळवंते,राधिका चिंचोलीकर,शबाना शेख सांगली,समिक्षा गणविर नागपूर, प्रविण भोरे,गणेश जोगदंड, दादाराव कांबळे, अजय हिवाळे, बाबासाहेब नवगिरे,विजय पानबुडे, विलास रणखांब,सुदाम लोंढे, अनिल कांबळे,सिध्दार्थ वैराळे , दिपक भालेराव, देविदास कांबळे संतोष करवंदे अंकुश गरड, भागवत सावंत, दतराव दळवे,सह सर्व तुळजापुरकरांनी अभिनंदन केले आहे.