जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स तर्फे उपोषण कर्त्यास त्वरित न्याय देण्यात यावा याकरिता तहसीलदार यांना निवेदन
आंदोलनाचा चौथा दिवस अधिकार्यांचे दुर्लक्ष
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील शेतकरी पुरणलाल आसाराम पारधी या पीडित शेतकऱ्याचे 2016 पासून न्यायासाठी संघर्ष सुरू असून न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून त्या आंदोलनाची संबंधित अधिकाऱ्याने अजून दखल न घेतल्यामुळे आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी गोरेगाव येथील तहसीलदार सचिन गोस्वामी यांची जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स च्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन उपोषणकर्त्यांची न्याय देण्याची मागणी केली व न्याय न मिळाल्यास गोरेगाव तहसील कार्यालयासमोर जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स च्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भूमापन क्रमांक 17 या सार्वजनिक जाण्या-येण्याच्या पांधन रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी 0.22 आर सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या येण्याजाण्याचा रस्ता बंद पडल्यामुळे त्यांच्या शेतातून निघणारा उत्पादन आहे त्यांनी घरी कसा आणावा प्रश्न निर्माण झालेला आहे ?त्यांचे शेतीकडे जाणारा रस्ता खुला करुन देण्यात यावा याकरिता पीडित शेतकरी हे स्वतःच्या शेतात 11जानेवारी 2022 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु आज चार दिवस होऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांच्या आमरण उपोषणकडे दुर्लक्ष केले आहे .उपोषण कर्त्याने सुद्धा जोपर्यंत रस्ता खुला करून देणार नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषणाला बसणार असे त्यांनी सांगितले भूमापन क्रमांक 17 या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्याला शेताकडे जाण्याचा रस्ता नाही .त्यामुळे त्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे ?शेतातील धान्य घरी कसा आणावे हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण केलेला आहे? त्यांनी आपली उदरनिर्वाह कशी करावी हा प्रश्न सुद्धा त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे ?याकरिता त्यांनी तहसीलदार गोरेगाव यांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला परंतु त्या रस्त्याकडे अजून दुर्लक्ष करण्यात आले .त्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतात आमरण उपोषण सुरू केले असून या आमरण उपोषणाला जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोरचे विदर्भ कार्यकारणी सदस्य देवेंद्र दमाहे ,सुरेश साठवणे ,रंजीत वालदे नागेश बडोले ,महेंद्र तीघारे ,हंसराज तीघारे ,गोरलाल कुसराम यांनी पाठिंबा दिलेला आहे.