गुन्हेगार प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई करणार – पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी (जि प्र) ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत जर गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ होत असेल व अवैध धंदेवाईक विरोधात व कायदा हातात घेऊन शांतता भंग करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे उदगार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांनी काढले ते लोकश्रेय मित्र मंडळ व लोकश्रेय न्यूज च्या वतिने घेण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी बोलत होते
संविधान विटंबे प्रकरणी ग्रामीण भागातील नागरिकांशी शांतते राहण्याचे आवाहन करण्यात आले होते व चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने व ग्रामीण भागात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसुन किंवा घडुदिलेला नसल्याने कायदा व सु व्यवस्था आबादीत ठेवण्याचे कार्य पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी केल्याने त्यांचा लोकश्रेय मित्र मंडळा च्या वतिने सत्कार करण्यात येत असल्याचे लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे सांगीतले तर ओ बी सी चे समाज सेवक सुभाष पांचाळ यांनी देखील पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या विषयी चांगले विचार व्यक्त केले पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी लोकश्रेय ने अमच्या कामाची दखल घेऊन सत्कार केल्याने हे दिवस नेहमी स्मरणात राहिल व ग्रामीण भागात कोणी कोणावर विनाकारण दादा गीरी अवैध व्यवसाय करीत असेल तर नागरीकांनी माझ्याशी संपर्क करावे असे आवाहन हि केले या वेळी दिलीप बनकर अग्रवाल बाबु भाई सत्तार भाई पोलीस कर्मचारी बनाटे श्री बिकाने यांच्यासह अनेक मान्यवर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.