प्राथमिक शाळा खडाळा येथे स्वयंशासन दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्र अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शालेय वयातच प्रशासनाचे धडे व प्रशासन चालविण्याचे कौशल्य प्राप्त व्हावेत म्हणून आठवीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस संपूर्ण शाळेचे नियोजन व प्रशासन चालवायचं असतं
या उद्देशाने हा स्वयंशासन दिन साजरा करण्यात येतो स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून इयत्ता आठवीतील चंद्रकांत गोविंद जाधव उपमुख्याध्यापक म्हणून कु. शिवानी अंगद बेंडे राहत्या याप्रसंगी याप्रसंगी स्वयंशासन दिन शिक्षक म्हणून सुमित बंडू शिंदे, सुरज रामराव शिंदे, रामानंद तळेकर, कोमल भगवान हनवते, नंदनी बालाजी जाधव ,सुदर्शन मच्छिंद्र शिंदे अवधूत रवी कदम, माऊली लिंबाजी काळे, श्रुती अशोक शिंदे ,पुनम रामेश्वर शिंदे ,सुनील नागोराव उतपलवार, शुभम कुंडलीक शिंदे आदींनी शिक्षक म्हणून काम पाहिले.स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली, आणि पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे, प्रल्हाद राठोड, ज्ञानेश्वर साखरे राहुल काऊतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे काम पाहिले.