नगर परिषद मानवत ची प्लास्टिक वापवरती दंडात्मक कार्यवाही

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरांमधील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकाणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती व दंडात्मक कार्यवाही मोहीम राबवली. शहरांमध्ये स्वच्छता अबाधित राहावी व रोगराई कमी व्हावी या उद्देशाने सदरील मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील सर्व व्यापारी, फळ विक्रेते, किराणा दुकान, कापड दुकान इत्यादी ठिकाणी धाडी टाकत 83 किलो प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आले आहे. दंडात्मक कार्यवाही मध्ये रू.23300/- चा दंड वसूल करण्यात आला आहे. यानंतर मुख्याधिकारी यांनी बोलताना असे सांगितले की प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग वापर करणाऱ्या वरती कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यास प्लास्टिक बंदी हा महत्त्वाचा भाग आहे

यामुळे यावरती विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग याचा वापर करू नये व प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी केले यांनी केले.
या मोहिमेत नगर अभियंता सय्यद अन्वर, कार्यलीयन अधीक्षक, भगवान शिंदे, आर बी चव्हाण, भारत पवार, एस.एस जोशी, मुंजासा खोडवे, एस.बी उन्हाळे, श्रीमती वंदना इंगोले, दीपक सातभाई, एस.एन रुद्रवार, पी आर पवार, विनय आडसकर, एस.एस काळे, सय्यद जावेद, सुनील कीर्तने, संजय कुऱ्हाडे, दीपक भदर्गे, संजय दवणे, रवी धबडगे, बाळू लाड, बळीराम दहे, अलीम अन्सारी, रितेश भदर्गे इत्यादी सर्व कर्मचारी या विशेष प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होते.