ताज्या घडामोडी

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील वड़ाळा पैकु येथे दूषित पानी व अनियमित पाण्याचा पुरवठा

तात्काळ चौकशी करण्याबाबत शिवसेना महिला आघाडीचे निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमूर

चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या वडाळा पैकु येथे दोन दिवसाआड़ नळाला पानी पुरवठा होत असून नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, संपूर्ण वडाळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथिचे रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, डेंगू सारखे पॉजिटिव रुग्ण सुधा वाढत आहेत गेल्या 6 ते 7 महिन्या पासून पाण्याची टाकी साफ केली नाही या संपूर्ण प्रकरणाकड़े नगरपरिषदचे दुर्लक्ष होत आहे, तरी आपन सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी सर्व वडाळावासियानच्या माध्यामातून शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका महिला आघाडीच्या वितिने चिमूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी भोयर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, संगीता कुमरे, सारीका केमये, माधुरी शिरभये, वनिता आडकिने, पुष्पा शिरभैये, वंदना आड़किने, वनिता रोकड़े, मंगला चौधरी, नंदा सावसाकड़े, सुशीला जाम्भूले, शहर प्रमुख अनंता गिरी, संतोष कामडी, विभाग प्रमुख आशीष बगुलकार, उपशहर प्रमुख सुभाष नन्नावरे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close