महिला बचत गटास कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.13/10/2021 बुधवार या दिवशी ऊमेद आभियान पं.स.परतुर अंतर्गत झाले एक वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या दत्तक व आधिपत्याखाली आसलेल्या गावातील स्वा.सा.महिला बचत गटाच्या महिलांनी कर्जाचे प्रस्ताव सादर केले असुन आणखी त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र आष्टी शाखाचे शाखा व्यवस्थास्थापक आयु.निलेश खरातसाहेब यांनी तत्काळ कर्ज वितरित करावे यासाठी काही निवडक महिलांनी दिले निवेदन आणि कर्ज जर तत्काळ उपलब्ध करून नाही दिल्यास यापुढे महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलन व उपोषणाचा करण्याचा दिला ईशारा यावेळी पं.स.परतुर ऊमेद आभियान चे आयु.लक्ष्मण शेळकेसर (ता.व्यवस्थापक -आर्थिक समावेशन) आयु.सिमा जंगले मँडम (को.हादगाव व आष्टी प्रभाग समन्वयक) यांनाही त्या निवेदनाची दुय्यम प्रत देऊन बँकेत कर्जासाठी पाठपुरावा करावा व लवकरात लवकर कर्ज गटानां उपलब्ध करून दयावे यासाठी विनंती केली तर सदर निवेदाची प्रत जिल्हा बँक आग्रणी आधिकारी जालना यांना पोष्टाने पाठवण्यात आली तसेच बँक व्यवस्थापक खरातसाहेब यांनी आठ ते दहा दिवसात कर्ज वितरित करु व सर्वं प्रस्ताव निकाली काढुन गंटाना कर्ज वितरित करु आसे आश्वासन महिलांना दिले निवेदन देताना आयु.प्रल्हाद कचरु वाहुळे (सामाजिक कार्यकर्ते)आयु. शिवगंगा सोंळके(प्रेरिका तथा परतुर ता.महिला अध्यक्ष)आयु.संगिता पोटे (प्रेरिका)आयु.मंजुशा ढोले (बँक सखी)आयु.मनिषा डोळसे आयु.शोभा पोटे,रुक्मिणी केकाण,कांताबाई आगळे,गिताबाई सोनटक्के, जिजाबाई गायकवाड, उषा पोटे,सिंधु सोनटक्के, ज्योती पोटे,मिरा दाभाडे, कस्तुरबा,पाईकराव,धोंडाबाई कडपे, चंफाबाई आठवले ईत्यादी महिला उपस्थित होत्या.