ताज्या घडामोडी

मौजे खेर्डा महादेव येथील अखंड हरिनाम सप्ताहाला आज रविवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिनानिमित्त मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 06 फेब्रुवारी 2022 ते 13 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान खेर्डा महादेव येथे प्रसिद्ध भारुडकर श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास आज गुरुवर्य महामंडलेश्वर हरिश चैतन्य महाराज 1008 यांच्या हस्ते ग्रंथ पूजा करून प्रारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, पंचमवेद संत तुकाराम गाथा व श्रीमद् भागवत ग्रंथाची ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, नंतर ग्रंथांची महापूजा करण्यात आली पूजेचे यजमान श्री संतोष आम्ले सपत्नीक होते. त्यानंतर पंडित महाराज कुरे यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वरी पारायण पार पडले, सकाळी 10 ते 12 या वेळेत गाथा भजन श्री ह भ प गंगाबुवा अकोलीकर यांच्या मार्गदर्शनात झाले, दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा श्री ह भ प अंगद महाराज डाके यांच्या सुश्राव्य वाणीतून झाली त्यांना साथ संगत श्री ह भ प सुमंत महाराज डाके, श्री ह भ प बळीराम महाराज शिंदे व मृदंग महामेरू पार्थपूर रत्न श्री ह भ प सुरेश महाराज पाथरीकर यांनी केली. भागवत कथा नंतर श्री तुकारामजी होगे यांच्यातर्फे महाप्रसाद झाला. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होईल व रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तन होईल. या आठ दिवसीय किर्तन मालेतील पहिले कीर्तन पुष्प श्री ह भ प अशोक महाराज पुरी हदगावकर हे गुंफतील.
या कार्यक्रमात दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत काकडा भजन, सकाळी 6 ते 7 पर्यंत विष्णुसहस्त्रनाम, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 श्री ह भ प अंगद महाराज डाके यांच्या मंगल वाणीतून श्रीमद भागवत कथा, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि जागर होईल.
सदर कार्यक्रमात प्रथम किर्तन पुष्प श्री ह भ प अशोक महाराज पुरी हे गुंफतील, तसेच श्री ह भ प बंडु महाराज धर्मे, श्री पांडुरंग महाराज उगले, श्री ह भ प सचिन महाराज लावणीकर, श्री ह भ प चांगदेव महाराज कंडारीकर, श्री हभप सारंगधर महाराज रोडगे, श्री सिताराम महाराज रोडगे यांची कीर्तने होतील तसेच दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद.
सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी श्री नारायणराव आम्ले, बाबासाहेब आम्ले व त्रिंबक आमले यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
अशी माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close