लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्रराज्याच्या वतीने निवेदन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक 28 / 7/2021 ला
लोक सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायदा यांची
गंगाखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फांडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदांराना निवेदन देन्यात आले .
एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 28 एप्रिल 2015 दप्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा व नागरिकांची सनद 2006 या संदर्भात निवेदन देन्यात आले.
निवेदना मध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लोकसेवा हमी कायदा 2015 व दप्तर दिरंगाई कायदा 2006 ची अंमलबजावणी व प्रसिद्धी तालुक्यातील आज झालेली दिसून येत नाही सदर कायद्याच्या अंमलबजावणी मुळे तालुक्यातील नागरिक शेतकरी यांना त्याची कामे वेळेत होणे शक्य होईल त्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांचे होणारे वेळेचे पैशाचे शारीरिक मानसिक नुकसान त्रास कमी होईल तसेच सरकारी लोकसेवक यांची कामात कुचराई दिरंगाई अडवणूक इत्यादी घर मार्गाला साफ असेल वरील शासन निर्णय व कायद्याच्या तरतुदी प्रमाणे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची सनद लावणे त्याची प्रसिद्धी करणे सर्वच कार्यालयाच्या दर्शनी भागावर फलक लावणे बंधनकारक असताना सुधा तहसिल कार्यालय गंगाखेड व तालुक्यातील इतर बऱ्याच कार्यालयामध्ये आस्थापनांमध्ये नागरिकांचे सणात लावण्यात आलेले नाही याची कारणे व याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ का होत आहे ते लेखी स्पष्ट करावे तरी आमची संघटना सर्व नागरिकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे वरील विषयाची तात्काळ अमलबजावणी कारवाई करावी व सर्वच कार्यालयांना तसे आदेशित करावे विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा संघटना या विरोध कायद्याच्या नियमाप्रमाणे संबंधित दोषी वर कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे व न्यायालयात दाद मागेल याची नोंद घ्यावी असे निवेदन गंगाखेड तहसील कार्यालय येथे देण्यात आले निवेदन देताना लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,
रोहिदास लांडगे महाराष्ट्र जनक्रांती सेना अध्यक्ष,
देवराव जंगले जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली, मुशरफ खान उपाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्य मराठवाडा व इतर कार्यकत्यांच्या उपस्थितित निवेदन देण्यात आले .