लालपरीचे चाके थांबले तर खासगी वाहने सामान्य प्रवाश्यांच्या मदतीला धावले

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
दिपावली च्या पूर्वी पासून एस टी महामंडळाच्या चालक वाहकांनी संप पुकारला आणि लालपरी ची चाके थांबली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची व प्रवाश्यांची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली प्रवास कसा करावा हा यक्ष प्रश्न निर्माण झाला कसे तरी प्रवाश्यांची यातना भोगत प्रवास केला परंतु ही बाब नेरी येथील सामाजिक कार्यकर्ते व चालक मालक संघटनेचे सदस्य प्रवीण वाघे याना ही बाब समजताच त्यांनी बुकींग असलेल्या स्वतः जवळील मिनी बस ज्या मार्गावर कुटलेही वाहन धावत नाही अश्या प्रवाश्यांच्या मदतीला देऊन सामाजिक दायित्व निभावीत गोर गरीब जनतेच्या कामाला लावल्या प्रवाश्यांना ताटकळत बसवून न ठेवता ताबडतोब चिमूर-मुल मुल – चिमूर अश्या वेळात मिनी बस ची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि खासगी बस ची चाके सर्वसामान्य प्रवाश्यांच्या मदतीला धावू लागली.

दिपावली हा सण म्हणजे जीवनातील महत्वपूर्ण सण असून वर्षात एकदाच येत असते या दीपावली सणाला साजरा करण्यासाठी सर्वच जन बाहेर गावावरून स्वगृही येत असतात व हर्षोउलसात आनंदाने साजरा करीत असतात परंतु सर्वसामान्य नागरिक व प्रवाश्यांच्या आनंदावर विरजण पडले. दिवाळी पूर्वी पासून एसटी महामंडळ च्या वाहक चालक यांनी संप पुकारला त्यामुळे मासळ पिपर्डा पळसगाव वासेरा शीवनी पेडगाव अश्या विविध ग्रामीण क्षेत्रातील जीवन वाहिनी लालपरीचे चाके थांबल्यामुळे सर्व सामान्य आणि नागरिकांचे प्रवास करण्यासाठी मोठे हाल झाले अनेक अडचणींचा सामना करीत ते कसे तरी गावाला पोहचले आणि आता भाऊबीज हा बहिणीचा भावाला ओवाळणी चा महत्वाचा सण या दिवशी सर्वसामान्य भाऊ बहीण लाल परी थांबल्यामुळे थांबले ही बाब लक्षात येताच वाहन चालक मालक संघटनेचे सदस्य प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी स्वतःच्या मिनी बस चिमूर पळसगाव पिपरडा मार्गे मुल तसेच अनेक खासगी गाड्या नेरी तळोधी आणि गावखेड्यात लावून ताटकळत असलेल्या प्रवाश्याच्या मदतीला धावले आणि त्यांची सोय लावली त्यामुळे परिसरातील अनेक गावातील नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहे.