ताज्या घडामोडी

नाटक हे सामाजिक प्रबोधनाचा माध्यम – खा. अशोक नेते

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे खास संविधान दिनाच्या निमित्ताने संगीत :- कलंकित ठरलयं तुझ मातृत्व या नाटकांचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटकाचे आयोजित उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दूरध्वनीद्वारे या नाटकांचे उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला.
या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना मी तेलगांना राज्यातील निवडणूक संबंधीत व्यस्त होतो त्यामुळे या नाटकाच्या प्रयोगाला येऊ शकलो नाही. तरी पण माझ क्षेत्रात येण झाल्यास नक्की आपली भेट घेईन. व्याहाड बुज वासिय जनतेनी दाखवलेल प्रेम व्यक्त करतो.या नाटकाचा चांगल्या तऱ्हेनी आस्वाद घ्यावा.नाटक हा समाज प्रबोधनाचा माध्यमातून असुन यातुन चांगला उद्बोधन घ्या. यावेळी समस्त जनतेला संविधान दिनाच्या व येणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे या प्रसंगी मोबाईल दूरध्वनीद्वारे खासदार अशोकजी नेते यांनी नाटकप्रेमी बांधव व भगिनींना प्रतिपादन केले.
या नाटका संबंधितची माहिती तेलंगणात खासदार अशोकजी नेते यांना खासदार महोदयांचे सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांनी दिली असता त्यामुळे खा.नेते साहेब हे नाटय रसिक प्रेक्षकांशी मोबाईल कन्फरन्सद्वारे संवाद साधल्याने मंडळातर्फे धन्यवाद मानले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने सरपंच कविता बोल्लीवार,माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, सामाजिक नेते तथा युवा काँग्रेसचे नेते कुणाल पेंदोरकर, ग्रा.प.सदस्य जनार्दन गुरूनुले, ग्रा.प.सदस्या वैशाली निकेसर, ग्रा.प.सदस्या रुपाली करकाडे, तंटामुक्ती अध्यक्ष कवडूजी ठाकुर, नव.भा.वि.शाळा व्यव. समितीचे अध्यक्ष संतोष मेश्राम,तंटामुक्ती अध्यक्ष भाषकर शेंडे, महेबुब खान पठान काका,धान्य व्यापारी रविंद्र निकेसर, महेश गड़्मवार, धान्य व्यापारी प्रविण सातपुते, देवाजी सातपैसे, नाटक आयोजक मंडळी अध्यक्ष रामदास जी गेडाम, कान्हुजी गेडाम,ज्ञानेश्वर निकोडे, अनिल अन्नमवार, मुकुंदा कुंभारे,बंडू निकेसर,तसेच सहयोगी मंडळी व मोठ्या संख्येने नाटय रसिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close