निस्कीन मॉक्स कुंग – फु मार्शल आर्ट वणी तर्फे डॉ.मेघा अभय पेटकर यांचा सत्कार
वणीच्या सौ . मेघा अ . पेटकर यांना मानद आचार्य पदवी बहाल झाल्याने निस्कीन मॉक्स कुंग – फु मार्शल आर्ट तर्फे सत्कार करण्यात आले.
मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे
वणी येथील निस्कीन मॉक्स कुंग – फु बहूउद्देशिय संस्थेच्या संचालीका सौ . मेघा अ . पेटकर यांना तामिलनाडू राज्यातील नुकत्याच होसुर येथे झालेल्या पदवीदान संभारंभात आर्ट मध्ये मानद आचार्य पदवीने सन्मानीत करण्यात आले . इंडियन एम्पायर युनिर्व्हिसिटी व युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने होसुर येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान संभारंभात सेन्साई मेघा पेटकर यांना त्यांनी केलेल्या कला व क्रिडा प्रकारातील मार्शल आर्ट मधील ( कराटे ) उतुंग कामगिरी व भरीव योगदानासाठी मानद आचार्य पदवीने इंडियन एम्पायर विद्यापिठाचे कुलगुरू व उपकुलगुरू , सि.ई.ओ. व सहा . कमिश्नर यांच्या उपस्थितीत सन्मानीत करून गौरव करण्यात आला . व त्यांना मिळालेल्या माना बद्दल निस्कीन मॉक्स कुंग – फु बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सिंहान शरद चिकाटे व ओकीनावा शोरीन न्यु , शोरीन कान , असोशिएशन इंडियाचे हंशी शरद सुखदेवे ( नागपूर ) यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या संचालीका सौ . मेघा अ . पेटकर यांचा सत्कार करण्यात आला . हा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सेन्साई अभय पेटकर , सचिव सेन्साई राजू घुमे ( मारेगांव ) , सेन्साई नरेश मुरस्कर , सेन्साई सिध्दार्थ सोनारकर , सेन्साई सचिन डाफे , तसेच कराटेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेवून अभिनंदन केले .