ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य ताना पोळ्याचे आयोजन

775 बाल गोपाळ नंदी बैल सोबत उपस्थित.

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे

चिमूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पहिल्यांदाच यावर्षी ताना पोळा आयोजन केले गेले यात 775 पेक्षा अधिक बालगोपाळ नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते.
कोरोना काळ संपल्या नंतर चिमूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्केट लाईन येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते, तान्ह्या पोळ्या मधे 775 च्या वर बालक नंदी सजावट करून सहभागी झाले होते, बाल गोपालांचा उत्साह वाढविण्याकरिता विविध प्रकारचे बक्षीस ईश्वर चिट्टी नुसार वाटप करण्यात आले, व सर्व सहभागी नंद्याणा बुक, पाणी बॉटल, नाष्टा प्लेट वाटप करण्यात आले, तान्हा पोळ्यात हरिभक्त परायण लालाजी शेंडे महाराज यांचे हस्ते नदी बैलाची पूजा करून पोळा उत्सवाला सुरुवात करण्यात आली, बाल गोपालांचा उत्साह वाढवीन्याकरीता आमदार कीर्ती कुमार भांगडिया यांनी भेट देत बाल गोपलांसी संवाद साधला, यांचे समवेत चिमूर व्यापारी मंडळचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, प्रमोद बारापात्रे, हिरा बलदुवा उपाध्यक्ष शाम बंग, सचिव बबन बनसोड, मनोज कठाने, हरीश सारडा प्रामुख्याने उपस्थित होते, बाल गोपालांचा उत्साह बघण्याकरीता हजारो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता प्रवीण सातपुते यांचे मार्गर्शनात दिलीप सातपुते, श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, प्रवीण बारापात्रे, रवी सातपुते, नागेश चट्टे, पप्पू शेख, अंकुश जुमडे, पप्पू बगुलकर, अशोक मेश्राम, राजू देसाई, अमर वांढरे, हिमांशू किरीमकर, राजू मेश्राम, अरडे, देवराव जुमडे, शाम खाटीक, मिलिंद सातपुते, गौरव सातपुते, व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close