नेरी येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
शिवजयंतीवर कोरोनाचा प्रभाव
शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांक 31 मार्च रोजी तिथीनुसार जयंती नेरी येथे शिवसेनेच्या वतिने उत्त्साहात साजरी करण्यात आली.
गेल्या वर्षा पासुन देशात कोरोना चे संकट देशावर वाढले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिबसेना पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या आदेशानवये व शिबसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाचे नियमाची दक्षता घेत आज साध्या पध्दतीने शिव जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजण चिमुर तालुका शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख सुधाकर निवटे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी नेरी शहर प्रमुख अरुण पिसे, वसंता मोहिनकर, विभाग प्रमुख किशोर उकुंडे,माजी युवासेना तालुका प्रमुख तथा भारतीय विद्यार्थी सेना माजी उपजिल्हा संघटक श्रीहरी सातपुते, संजय डोंगरे, राजू बावने, गुड्डू डोंगरे, आशीष उकुंडे, प्रीतम डोंगरे, लक्ष्मण दडमल, नरेश मेश्राम उपस्थित होते.