ताज्या घडामोडी

नेरी गावातील दारूची दुकाने व बार गावा बाहेर स्थानांतरीत करा

गांधी वार्डातील नागरीकांकडुन निवेदनाद्वारे मागणी

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

चिमुर तालुक्यातीत नेरी गाव हे मोठया लोकसंखेचे असुन तिस – पस्तीस गावाचा संपर्क नेरीशी आहे. त्यामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या पण भरपुर आहे. गावातील नागरिकांना दारू पिणाऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणुन जुनी सुरु होनारी दारूची दुकाने व बार गावाच्या बाहेर स्थानांतरीत करा अशी मागनी गांधी वार्ड मधील नागरीकांनी केली आहे.
गांधी वार्डमध्ये जुने देशी दारूचे दुकान होते महाराष्ट्र शासनाने संपुर्ण देशी व विदेशी दारूची दुकाने बंद केले होते परंतु महाराष्ट्र शासनाने पुन्हा चंद्रपुर जिल्हयातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय व दारुची दुकाने पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणुन गांधी वार्डात एक जुने देशी दारूचे दुकान होते ते सुरू होण्याची शक्यता आहे पण त्या वार्डात या पाच वर्षात बरीचशी सुधारणा झाली आहे. त्यात काँपुटर एज्युकेशन , सी.एस.सी. सेंटर , बँक सेवा , महाऑनलाईन केंद्र , मंडळ अधिकारी ऑफीस , पॉरले जी एजन्सी , पतसंस्था , शाळा , गोंड समाजाचे कुलदैवत व नेरी वासीयांचे श्रद्धास्थान असलेले मातेचे मंदीर अशा अनेक सोई सुविधा या वार्डामध्ये सुरु झाल्या आणी जेव्हा तिथे देशी दारू दुकान सुरु होते तेव्हा वार्डातील शांतता भंग पावली होती कित्तेकांच्या संसारावर खुपच वाईट परिनाम पडला होता , दारू विक्री व पिणाऱ्यांची दादागीरी वाढली होती त्यामुळे घराघरात कलह तयार होऊन शांतता भंग पावली होती व पुन्हा त्याच ठिकाणी देशी दारुचे दुकान सुरू झाल्या नंतर पुर्वीसारखीच परिस्थिती निर्मान होण्याची दाट शक्यता आहे . म्हणुन सदर देशी दारू दुकानाला जुन्या ठिकाणी परवांगी न देता गावाबाहेर स्थानानंतरीत करा अशी मागणी गांधी वार्डातील नागरीकांकडून होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close