ताज्या घडामोडी
नागभिड येथे नवजात शिशुला शेतात फेकले
हाच तो नवजात शिशु
तालुका प्रतिनिधी : जागृती मरस्कोल्हे नागभिड
नागभिड येथे दिनांक ३ जुन ला रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी डॉ. शिवनकर यांच्या दवाखान्या जवळ शेतात नवजात शिशुला फेकुन दिले.
नागभीड येथील नागरीक मॉर्निंग वॉक ला गेले असता त्यांना शेतात नवजात शिशु पडलेले दिसले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या शिशुला डॉ .काळे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी त्या नवजात शिशुवर लगेच उपचार सुरु केले असुन आत्ता त्याच्या जिवाला काही धोका नाही.
ही माहीती नागभिड शहरात पसरताच नवजात शिशुला दत्तक घेण्याकरीता दवाखान्यात गर्दी झाली
या सर्व घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली असुन नवजात शिशु ला शेतात कोनी टाकले याचा शोध नागभिड पोलीस घेत आहेत.