मोहाळी ( मोकासा) येथे जादू टोना केल्याच्या संशयावरून ईसमाच्या घरी जाऊन मारहाण
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मोहाळी ( मोकासा) येथे जादू टोना केल्याच्या संशयावरून ईसमाच्या घरी जाऊन मारहाण केली. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी ला अटक करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादू टोना प्रकरण सुरू असतानाच मोहाळी येथील रहिवासी दिलीप सिताराम वाघ ( ४९ ) हे घरी दरवाज्यात बसले असताना आरोपी विकास विनायक गजभे ( १९) रा. मोहाळी (मोकासा ) याने दिलीप च्या घरी येऊन तुने माझ्या मोठा भाऊ वैभव वर जादू केली आहे तु घराबाहेर निघ असा म्हणून त्यांने दिलीप ला शिवीगाळ करून चप्पल त्याच्या उजव्या गालावर मारुन हाताबूक्यानी मारहाण केली. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन नागभीड येथे कलम ४५२,३२३,५०४ भांदवी सहकलम ३(१), ३(२) महा नरबळी आणि ईतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम २०१३ अन्वये काल उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आले आहे. सदर आरोपी व तक्रारदार याचे आधीपासूनच घरगुती वाद होते, याच वादातून कालचा शुल्लकसा वाद झाला, अशा चर्चा मोहाळी गावात सुरू आहेत. आरोपी व तक्रारदार एकाच समाजाचे असल्यामुळे गावात शांतता आहे.
लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये , व शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक चंद्रपूर अरविंद सावळे यांनी केले आहे.