खा. अशोक नेते यांची मुलचेरा तालुक्यातील मौजा- भगतनगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ ला सदिच्छा भेट


प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
दि.१९ जानेवारी 024 ला
मुलचेरा तालुक्यातील मौजा- भगतनगर येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठया आनंद उत्साहाने गावातील नागरिक एकत्रित येऊन भक्ती भावनेने पुजा अर्चना करत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या भागवत कथेच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांचे शाल श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत केले.
या भागवत कथा ज्ञानयज्ञ च्या धार्मिक कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट देत दर्शन घेऊन अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज असून या धार्मिक कार्यक्रमामुळे आचार, विचार ,संस्काराची निर्मिती होते. यासाठी भागवत कथेच्या माध्यमातून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, भाजपा तालुकाध्यक्ष संजय सरकार,तालुका महामंत्री सुभाष गणपती,तालुका महामंत्री विजय बिशवास, बंगाली आघाडी तालुकाध्यक्ष मोटुला सरकार,मधू वैष्णव,सुभ्रत व्यापारी,अशिम चक्रवती,पुलख मंडल,सरोज घरामी,तसेच भाविक भक्त उपस्थित होते.