तहसीलदारांच्या केबिनमध्ये लाच पोहोचताच मारला छापा
तहसीलदारासोबत महसूल सहाय्यकाची भागीदारी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यातील बदनापूर आणि रामखेडा या शिवारात असलेल्या असलेली शेतजमीन भोगवाटेदारांच्या नावावर करण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांना 30हजरांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्या असून ही लाज जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची बदनापूर आणि रामखेडा शिवारात शेतजमीन आहे. तक्रारदाराचे आजोबा वारल्या नंतर वारसदार म्हणून तक्रारदाराच्या काकांच्या नावाने एकत्रित कुटुंब कर्ता म्हणून सातबारावर नोंद घेण्यात आली होती .त्यानंतर ही नोंद कमी करून इतर वारसांच्या नावाने सातबाराला नोंद घ्यावी यासाठी तक्रारदाराने तहसील कार्यालयात रीतसर अर्जही केला होता .त्यानुसार ऑनलाईन सातबारा ला नोंद करून घेण्यासाठी तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे, वय वर्ष 50 ,वर्ग एक, राहणार अप्रतिम वास्तू, चाटे स्कूल जवळ सातारा परिसर, छत्रपती संभाजी नगर यांनी महसूल सहाय्यक वय 34 वर्ग तीन, निलेश धर्मराज गायकवाड ,राहणार पोलीस कॉलनी, पोलीस मुख्यालय जालना. याच्यामार्फत 30000 रुपयांची लाच मागितली . त्यानुसार सातबारावर नोंद घेण्याचे आदेश निघतील असे सांगितले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने जालना येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीची शहानिशा करून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी वर्ग तीनचा महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांनी तक्रारदाराकडून तीस हजार रुपयांची लाच घेतली आणि ती तहसीलमध्ये बसलेल्या तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे यांच्या केबिनमध्ये नेऊन दिली. लाच स्वीकारताच सापळा लावलेल्या अधिकाऱ्यांनी तिथे छापा मारला आणि लाचेसह या दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.