ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने पालावरील कुटुंबांची दिवाळी केली गोड

गरजु कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव-श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गटपट योजनेंतर्गत शहराजवळील गेवराई रोड भागात पालावर वस्ती करून राहणारे अनेक कुटुंब आहेत. भौतिक सुखसुविधा, शिक्षणापासून कोसो दूर हा समाजातील घटक आहे, सामाजिक जाणिवेतून येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने या कुटुंबांसाठी मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी योगदान देऊन अशा कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. यापुर्वी याच भागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून गेल्या दोन आठवड्यापासून त्या मुलांचे शाळेने तेथे जाऊन संस्कार वर्ग सुरू केले आहेत. दिवाळी फराळ वाटप करण्यात आला यावेळी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने, मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, पर्यवेक्षक उमेश थाटकर, रवींद्र खोडवे तसेच गटपट रचनेचे उपक्रम प्रमुख कमलाकर झोडगे, वंचित घटकातील मुलांच्या संस्कार वर्गाचे उपक्रम प्रमुख पंडित मेंडके, सदाशिव ढगे, रामेश्वर कुंभार, उध्दवराव विभुते, नवनाथ सांगुळे, शिवहरी गिरी,हू आदिनाथ कुंडकर, नितीन सोनवणे, सुरेश रोकडे, प्रकाश राठोड, लक्ष्मण भंडारे, राहुल नाईक, विजयकुमार सोन्नर, अनिल रामडोहकर, अशोक लावंड श्रीमती सुरेखा गवळी, श्रीमती पल्लवी कानडे, श्रीमती प्रज्ञा देशपांडे इत्यादी उपस्थित होते. या उपक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती प्रज्ञा देशपांडे यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close