राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चिमूर पंचायत समिती सभागृहात जिल्हा आढावा बैठक संपन्न
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे मा. खासदार अशोकजी नेते व आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे मा. खासदार अशोकजी नेते व आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी मा. मंत्री महोदयांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध महत्वपूर्ण विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. या बैठकीच्या सुरवातीला मा. मंत्री महोदयांसमवेत मा. खासदार अशोकजी नेते व आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्रीहरी बालाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या आढावा बैठकी दरम्यान खासदार अशोक जी नेते यांनी बोलतांना घरकुल बांधकामामध्ये रेती हा महत्त्वाचा घटक असून या रेतीमुळे अनेक घरकुलाचे बांधकाम रखडलेले आहे. रेतीही महाग असल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला, गरीब व्यक्तीला घरकुल बांधकामात रेती खरेदी करणे परवडत नाही त्यामुळे राज्यातील संपूर्ण घरकुल धारकांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बैठकीदरम्यान मागणी केली.
या बैठकीला प्रामुख्याने मा. जिल्हाधिकारी विनय गौडा सर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर विवेक जॉन्सन सर, मा. प्रकल्प अधिकारी मुरुगनाथम (एम आय.ए.एस.) सर, मा. अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे सर, मा. प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूर किशोर घाडगे सर, मा. एसडीपीओ चिमूर राकेश जाधव सर, तहसीलदार चिमूर प्राजक्ता बुरांडे मॅडम, मुख्याधिकारी न.प. चिमूर डॉ. सुप्रिया राठोड मॅडम, पोलीस निरीक्षक चिमूर गभणे सर, सावलीचे तहसिलदार पाटील साहेब, तालुका कृषी अधिकारी चिमूर तिखे सर, बिडीओ पं.स. चिमूर राठोड सर, अप्पर तहसीलदार भिसी पवार सर, उपअभियंता सा.बां. विभाग चिमूर उपगंडलावार सर व इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.