ताज्या घडामोडी

भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

मानेगाव येथील घटना लाखनी पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला ही घटना लाखनी तालुक्यातील मानेगाव(सडक) येथे बुधवारी सकाळी ११ वाजता च्या सुमारास घडली.


प्रशांत उर्फ पिंटू उमराव लोटे (३०) रा.रेंगोळा असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमी प्रशांत हा पिंपळगाव सडक येथील डांबर प्लांट वर जेसीपी चालक म्हणून कार्यरत आहे काही महत्त्वाचे कामकाज आटोपून दुचाकी क्र.MH ३५ C ५६६८ ने स्व गावी निघाला होता. दरम्यान मानेगाव(सडक) येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना साकोली कडून भरधाव आलेल्या MH४९ U०४२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकी अपघातात दुचाकीस्वार प्रशांतला गंभीर दुखापत झाली घटना घडताच परिसरात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेतली आणि जखमी प्रशांतला मदत करीत तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.
दरम्यान ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज वाढवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरम्यान नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकासह वाहनास पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी राखणे पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर गंभीर जखमी प्रशांतला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि तिथून नागपूरला हलविण्यात आले आहे घटनेचा अधिक तपास लाखनी पोलिस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close