समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपुर यांचे मार्फत मुख्यमंत्री, सामाजकल्याण मंत्री यांना उपविभागीय अधिकारी सिंदेवाही यांना निवेदन

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे
सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त गट अ व समाजकल्याण अधिकारी गट ब या पदभरतीत शैक्षणिक पात्रता समाजकार्य शिक्षण करण्याबाबत व ही पदभरती राज्य सेवा मध्ये समाविष्ट न करता सरळसेवा मधुन भरावे या साठी मा. उद्धव ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. धनंजय मुंडे साहेब, समाजकल्याण मंत्री, महा.राज्य याना उपविभागीय अधिकारी सिंदेवाही यांचा मार्फत निवदेणं देण्यात आले
निवेदनात महिला बाल विकास अधिकारी , परिविक्षा अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गट अ हे नियम शास्नान ते नियम न बद्दलवता सरळसेवा मधून भरण्यात यावे
ही मागणी आज समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, चंद्रपुर ने केली.
ही जर मागणी मान्य न झाल्यास समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाने आंदोलन करण्याचे इशारा दिला आहे
यावेळी निवेदन देताना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार, सौ. वंदना हिंगे मॅडम , गोटे मॅडम व इतर सदस्य उपस्थित होते.