पुयारदंड ग्रा.प शिपाई पदभरती निवड हे पारदर्शक पध्दतीनेच
सरपंच,सदस्यानी केलेला आरोप बिन बुडाचा
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पचायत पुयारदंड येथे ऑगष्ट 2019 पासुन ग्राम पचायत मध्ये शिपाई पद रिक्त असल्याने सरपंच यांच्या आदेशान्वये मासीक सभेचे आयोजन करण्यात आली होती त्यामध्ये ग्राम पंचायत शिपाई पदाची भरती करणे आहे सर्वानुमते मंजुर करण्यात आला यांच संबधीतची माहीती पंचायत समितील वरीष्ट अधिकारी याना माहीती देण्यात आली त्याच्या पदभरती संबधीत परवांगी घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील नोटीस बोर्डावर सरंपच यांच्या सहीनिशा गावातील युवकानी कडून शिपाई पदाची भरतीचे अर्ज मागवण्यात आले त्यामध्ये बारा उमेदवारीनी शिपाई पदभरतीचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाले,अर्जाची छाननी करुण दिनांक 25 मार्च 2021 ला वेळ 11:00 वाजता जिल्हा परीषद शाळा मध्ये, अर्ज प्राप्त उमेदवारा कडून 100 मार्काची परीक्षा घेण्यात आली यामध्ये दोन अर्जदार गैरहजर होते, सरपंच, सह सर्व सदस्यांच्य उपस्थित शांततेत परीक्षा पार पडली या संबधीत वरीष्ट अधिकारी यांना माहीती देण्यात आली , 31 मार्च 2021 ला झालेल्या परीक्षेचा निकाल करीता सरपंच, सर्व सदस्य यांच्या समक्ष पेपर तपासणी करण्यात आली परीक्षार्थी उमेदवाराचे प्राप्त गुण या प्रमाने मंगेश जांभुळे 66, समिर सुरस्कर 80, राहूल कन्हाके 74, सुधाकर जांभुळे 59,अमोल जाधव 29,अशोक कन्हाके 67 मंगेश बल्की 97 ,अजुत बहादूरे 57, रजत मेश्राम 55, महंद्र कन्हाके 46 असुन परीक्षार्थी गुणपत्रीका सरपंच यांच्या सहीनिशा नोटीस बोर्डावर लावण्यात आले
सदर परीक्षेचा निकाला मध्ये सर्वाधीक गुण प्राप्त उमेदवारला नियुत्ती आदेश दिनांक 12 एप्रील 2021 ला देण्याचे ठरले असता सरंपच यानी सदर शिपाई पदभरती मान्य नसल्याचे सांगीतले, सर्वाधीक गुण प्राप्त उमेदवार मला मान्य नाही कारण पात्र उमेदवार हा खुप शिकलेला आहे, तो आम्हाला शिकवेल, एवढा शिकलेला मुलगा ग्राम पंचायत मध्ये शिपाई घेऊन, इथ का शाळा शिकवायचा आहे काय,असे सरपंच मला म्हणाल्यात या संबधीत ची माहीती पंचायत समिती येथे वरीष्ट अधिकारी याना माहीती दिली परंतु पुयारदंड ग्राम पंचायत शिपाई पदभरती निवड पारदर्शक व सर्वाच्या सहमतीने पार पडली त्यामुळे ग्राम पंचायत सरपंच सह सदस्य यानी केलेला आरोप बिनबुडाचा आहे असे ग्राम पंचायत पुयारदंड येथील ग्रामसेवक पि.जी कन्हाके यांनी सांगीतले आहे.